घरात पत्र टाकून खंडणीची मागणी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

तळोजा फेस 1 येथील एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मुलाला मारण्याची धमकी देणारे पत्र त्याच्या घरात टाकून पैसे आणि सोन्याच्या स्वरूपात खंडणीची मागणी केली. याप्रकरणी उबेर लयीक शेख याच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद राशिद अशपाक खान हे तळोजा फेज 1 येथे राहत असून त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करून तिच्या नावाने चिठ्ठी प्राप्त झाल्याचे सांगितले. या चिठ्ठीत राहील या त्यांच्या 10 वर्षीय मुलाच्या नावाने धमकी आली. त्यावेळी त्यांनी इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता बाजूला राहणारा उबेर शेख हा पांढरे इन्व्हलप दरवाजातून घरामध्ये टाकताना दिसून आला. या पत्रामध्ये त्यांचा मुलगा राहील याच्या जीवाचे बरे वाईट करण्याचे धमकी देणारे पत्र पाठवून त्यांच्याकडे पैसे आणि सोन्याच्या स्वरूपात खंडणीची मागणी केली होती.

Exit mobile version