गटविकास अधिकार्यांचा मनमानी कारभार
मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली
। पेण । वार्ताहर ।
ग्रामसेवक अगर ग्रामविकास अधिकारी यांना आपले मुख्यालय न सोडण्याचे व जर एखाद्या ग्रामसेवकाला अतिरिक्त भार द्यायचा असेल, तर तो 8 कि.मी. परिघाच्या आतच देणे गरजेचे आहे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. असे असताना प्रभारी गटविकास अधिकारी प्रसाद म्हात्रे यांनी सदरील आदेशाला केराची टोपली दाखविली असून, पेण तालुक्यातील पाच ग्रामसेवकांना 8 कि.मी.पेक्षा जास्त परिघ असलेल्या ठिकाणी अतिरिक्त भार दिला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, प्रत्येक वेळी किरकिर करणार्या ग्रामसेवकांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकार्यांचे आदेश असतानादेखील या नियुक्त्या स्वीकारल्या कशा? विशाखा पेडवी यांचे मुख्यालय निगडे असून, त्यांना अतिरिक्त भार काळेश्रीचा दिला आहे. या दोन गावांमधील अंतराचा विचार केले असता 20 कि.मी.पेक्षा ही जास्त आहे. कृष्णा पांडुरंग पाटील यांचे मुख्यालय पाटणोली, अतिरिक्त भार बेणसे या दोन ग्रामपंचायतींमधील अंतर 30 ते 35 कि.मी.चा आहे. संजय शंकर जाधव यांचे मुख्यालय काराव अतिरिक्त भार झोतिरपाडा या दोन गावांमधील अंतराचा विचार करता 20 ते 22 कि.मी. आहे. निता जितेंद्र म्हात्रे यांचे मुख्यालय महलमिरा डोंगर अतिरिक्त भार जावळी या दोन गावांमधील देखील अंतर 20 कि.मी.चा आहे. तर परमेश्वर सवाईराम जाधव यांचे मुख्यालय मळेघर अतिरिक्त भार शिहू-मुंढाणी या दोन गावा मधील देखील अंतर 28 ते 30 कि.मी. एवढे अंतर आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, शासन नियमांना बगल देऊन गटविकास अधिकार्यांनी केलेल्या बदल्या व ग्रामसेवकांनी घेतलेला कार्यभार हा सध्या पेण पंचायत समितीमध्ये चर्चेचा विषय होऊन बसला आहे.
ग्रामसेवकांना कामाचा अतिरिक्त भार
