| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा येथील श्री समर्थ नेत्रालय यांच्यावतीने वावेघर येथील गणेश मंदिराच्या सभामंडपात मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत आयड्राॅप वाटप करुन अत्याधुनिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी करण्यात आली. या शिबिराचा 215 नागरिकांनी लाभ घेतला. यातील 45 नागरिकांना मोतिबिंदू असल्याचे दिसून आले. त्यांची सवलतीच्या दरात दुर्बिंणीद्वारे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच, शिबिरात 50 टक्के सवलतीत चष्मांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात नेत्ररोग तज्ञ डॉ. विशालाक्षी शेडबाळे यांनी रुग्णांना मार्गदर्शंन केले. याप्रसंगी नेत्ररोग तज्ञ डॉ.विशालाक्षी, अर्चिंस शेडबाळे, गुरुनाथ गाताडे, प्रियांका खुडे, कविता पाटील, शशिकला चव्हाण, गीता माने, गायत्री पवार, कल्पेश कोलंबे, गीतांजली आदीसह नागरिक उपस्थित होते.







