| नागोठणे | वार्ताहर |
लायन्स क्लब नागोठणेतर्फे आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या सहकार्याने तसेच नागोठणे शहरातील प्रसिद्ध व्यापारीव व पॉप्युलर ट्रेडिंग कंपनीचे मालक नजमुद्दीन व्होरा यांच्या सौजन्याने बुधवारी (दि.5) नागोठण्यातील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यानमध्ये मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात एकूण 76 नागरिकांची नेत्रचिकित्सा करण्यात आली. यांतील 22 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पनवेल येथील रूग्णालयात पाठविण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन नजमुद्दीन व्होरा यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी बोलताना नजमुददीन व्होरा यांनी यापुढेही अशा अनमोल कार्यासाठी माझी कोणतीही मदत लागल्यास मला केव्हाही सांगावे असे स्पष्ट केले.
लायन्स क्लब नागोठणेचे उपाध्यक्ष विवेक करडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शिबिराला सौ. रिहाना व्होरा, एमजेएफ लायन सुधाकर जवके, एमजेएफ लायन विवेक सुभेकर, लायन्स क्लबचे खजिनदार लायन संतोष शहासने, जॉईंट सेक्रेटरी लायन सुनिल कुथे, डायरेक्टर लायन दौलतराम मोदी, व्हा. प्रेसिडेंट लायन विशाल शिंदे, सौ.माधुरी सोष्टे, हुनेदभाई सैफी, आब्बासभाई सैफी, जुजरभाई काचवाला, सौ. तसनीम काचवाला उपस्थित होते. या कार्यक्रमात विवेक सुभेकर यांनी रुग्णांनी घ्यायची काळजी याचे मार्गदर्शन करतांनाच हे मोफत मोतिबिंदू शिबीर लायन्स क्लब नागोठणे तर्फे दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी घेण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. अधिक माहितीसाठी 9270499113 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्यास सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन विवेक सुभेकर यांनी केले.