। अलिबाग । प्रतिनिधी ।
नेत्रदान पंधरवड्याचासमारोप सोहळा तसेच नेत्रदान कृतज्ञता सोहळा जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. सचिन गोमसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. एप्रिल 2024 पासून जिल्हा रुग्णालयात नेत्रदान झालेल्या नेत्रदात्यांच्या नातेवाईकांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन आभार मानण्यात आले. तसेच परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. किरण शिंदे, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. निशिकांत पाटील, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चेतना पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. संगमेश्वर महाजन, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. शंतनू डोईफोडे, डॉ. अजय इंगळे, डॉ. ईश्वर मेश्राम, अधिसेविका गायत्री म्हात्रे यांच्यासह विविध विभागाच्या परिसेविका, नेत्रचिकित्सा अधिकारी आदी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मरणोत्तर नेत्रदानाबद्दल नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये स्व. प्रसाद हिराजी देवरूखकर, स्व. सुनिता दत्तात्रेय सगर, स्व. जितेंद्र अनंत घरत, स्व. शशिकांत तुकाराम पाटील, स्व. कमळाकर दत्तराम वडे, स्व. शकुंतला जगन्नाथ डवले यांच्या मरणोत्तर नेत्रदानाबद्दल नातेवाईकांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेत्रविभागाच्या सर्व अधिकारी कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.