शेकापच्या माध्यमातून नेत्र तपासणी व चष्मे वाटप

माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील यांची उपस्थिती; शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून व शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने अलिबागमध्ये शास्त्रीनगर परिसरात शनिवार (दि.22) मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप करण्यात आले. या शिबीराला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.


हा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नृपाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी माजी नगरसेवक प्रदिप नाईक, अ‍ॅड. गौतम पाटील, वृषाली ठोसर, अनिल चोपडा, संजना किर, शैला भगत, शेकाप पुरोगामी युवक तालुका प्रमुख विक्रांत वार्डे, अजय झुंजारराव, प्रकाश राठोड, संजय कांबळे, सचिन सारंग, लक्ष्मण पवार, कमळ राठोड, बंड्या भगत तसेच जिल्हा रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉ. अजय इंगळे, नेत्रचिकित्सालय अधिकारी प्रमोद खानावकर, साहील म्हात्रे, समुपदेशक अक्षय गोरे, कक्ष सेविका प्रियंका भगत आदी उपस्थित होते.



डोळ्यांच्या आजाराचे निदान तातडीने व्हावे, यासाठी शेकापच्या माध्यमातून हा  उपक्रम राबविण्यात आला. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या नेत्र  तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रमाला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. नेत्र तपासणी केल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबीराचा लाभ सुमारे पाचशे जणांनी घेतला. शेकापच्यावतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे अलिबागमधून कौतूक करण्यात येत आहे.

Exit mobile version