| म्हसळा | वार्ताहर |
रविप्रभा मित्र संस्था रायगड, डोळ्यांचे हॉस्पिटल म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा येथील , डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. म्हसळा ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. महेश मेथा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या नेत्र तपासणी शिबिराला ज्येष्ठ नेत्र तज्ज्ञ डॉ. कामथ, डॉ. सलीम ढलाईत यांनी रुग्णांची नेत्रतपासणी केली.
या कार्यक्रमास रविप्रभा मित्र संस्थेचे संस्थापक रविंद्र लाड, म्हसळा तालुका हिंदू समाज अध्यक्ष महादेव पाटील, शकूर घनसार, सुरेश कुडेकर, कौस्तुभ करडे, अनिल काप, प्रदिप कदम, निकेश कोकचा, श्रीधर महामूनकर अमित महामूनकर, रायगड बँक शाखा म्हसळा व्यवस्थापक मंगेश मुंडे, निलेश मांदाडकर, दादा पानसरे संस्थेचे सर्व पदाधिकारी आणी मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे प्रास्ताविक श्रीकांत बिरवाडकर यांनी केले, सूत्रसंचालन सुनीत नटे यांनी केले तर संतोष उद्धरकर यांनी सर्वांचे आभार मानले.