61 जणांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणार
| अलिबाग | प्रतिनिधी |
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या पोयनाड शाखेचा चौथा वर्धापन सोमवारी (दि.18) साजरा कराण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून आदर्श नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग, लायन्स क्लब अलिबाग-पोयनाड, लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे नेत्र चिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 195 जणांची नेत्रा चिकित्सा करण्यात आली. यातील 61 रुग्णांची नेत्रबिंदू शस्त्रक्रिया आदर्श मार्फत मोफत करण्यात येणार आहे.
या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे संचालक व पोयनाड शाखा पालक संचालक अनंत म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लब पोयनाडचे सर्व सदस्य, माजी मुख्याध्यापक के.डी. म्हात्रे, डॉ. शुभदा कुडतळकर यांचे सत्कार संस्थेचे वतीने करण्यात आला. तसेच, राजन पांचाळ यांना बाळशास्त्री जांभेकर राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आदर्शचे संचालक सतीश प्रधान यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, विलाप सरतांडेल उपस्थित होते.