पत्रकार संघर्ष समितीतर्फे नेत्रतपासणी

| माथेरान | वार्ताहर |

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती ,जागृती फाऊंडेशन, लायन्स क्लब ऑफ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील फणसवाडी आदिवासी वाडी येथे हेदुटणे, फणसवाडी, वलप येथील आदिवासी समाजासाठी मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शिबिराचा शेकडो आदिवासी नागरिकांनी लाभ घेतला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले तर लायन्स क्लब चे डिस्ट्रिक चे आदीवासी अपलिफ्टमेन्ट लायन देवासीस मित्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी निलेश सोनावणे, शंकर वायदंडे, विशाल सावंत, राम बोरीले, सुनील वारगडा, अनिल राय, संदेश पाटील, प्रितेश भोईर, ज्योत्सना भोईर, कल्पेश कांबळे, विष्णू भोईर, एस जी चव्हाण, सचिव अशोक गिल्डा, लायन हेमंत ठाकूर, प्रोजेक्ट को ओरिडीनेटर प्रमोद राजहंस, राज शिंदे, अक्षय जाधव, डॉ लुईस कोलॅसो, निक्सल यांच्यासह पालेबुद्रुक ग्रामपंचायत च्या सरपंच कांचन वास्कर, तंटामुक्ती अध्यक्ष विजय भोईर, माजी उपसरपंच दिनकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर भोईर, रघुनाथ नाईक, दशरथ पाटील, दिलीप पाटील, संजय भोईर रा जी प शाळा फणसवाडीच्या नेहा गावंड, सरिता सरगर आदीसह आदिवासी वाडीतील नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते .

Exit mobile version