लायन्स क्लब पोयनाडतर्फे नेत्र तपासणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

लायन्स क्लब पोयनाड आणि ग्रुप ग्रामपंचायत श्रीगाव आयोजित, लायन्स हेल्थ फाऊंडेशन, चोंढी यांच्या सहकार्याने मंगळवारी (दि.12) ग्रुप ग्रामपंचायत, श्रीगावच्या कार्यालयात मोफत नेत्रतपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 79 नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यात 24 जणांमध्ये मोतीबिंदू आढळले.

याप्रसंगी लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष प्रमोद राऊत, प्रदीप सिनकर, प्रगती सिनकर, विकास पाटील, प्रमोद पाटील, महेंद्र पाटील, अरविंद अग्रवाल, गणेश म्हात्रे, माधव पाटील यांची उपस्थिती होती. या शिबिरासाठी ग्रुप ग्रामपंचायत श्रीगावचे सरपंच यशोदा नाईक, विलास म्हात्रे, डॉ. प्रतीक कणसे, प्रचिती किणी, सिद्धी पाटील, श्रावणी मसूरकर, दीपिका पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामसेवक गणेश म्हात्रे यांनी या शिबिराचा फायदा गरजूंना होणार असल्याचे सांगून लायन्स क्लब पोयनाडचे आभार मानले.

Exit mobile version