विघवली हायस्कूलमध्ये नेत्रतपासणी शिबीर


| माणगाव | वार्ताहर |

माणगाव शहर कुणबी समाज संघटना व श्री न्यू ऑप्टिकल माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील इंदापूर जवळील विघवली विभाग हायस्कुल याठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 10) सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत करण्यात आले आहे. सदर शिबिरासाठी रोहा येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. देवेंद्र जाधव हे रुग्णांची नेत्रतपासणी करणार आहेत. तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

शिबिरात दत्ताराम काळू सत्वे ( कोशिंबळे) व दीपा दिनेश वारेकर यांच्या स्मरणार्थ मोफत चष्मे व औषधे वाटप करण्यात येणार आहेत. या शिबिरास विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम, प्रभाकर उभारे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, बाळकृष्ण बेंडखळे, नामदेव शिंदे, विनायक सापळे, दिलीप उभारे आदी मान्य वर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिबिराच्या अधिक माहितीसाठी कृष्णा पानवकर मो. नं. 9049247592 , संतोष मालोरे मो. नं. 8983435384, शंकर उभारे मो. नं.9403090861, सीताराम भोनकर मो. नं. 8806276039 यांच्या कडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version