ताडवागळे येथील नेत्रचिकित्सा शिबिरात 55 जणांची नेत्र तपासणी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब पोयनाड ही समाजसेवी संस्था पोयनाड पंचक्रोशीत वंचित, दीनदुबळ्यांसाठी विविध उपक्रम राबविते. या उपक्रमातर्गत लायन्स क्लब पोयनाड आणि हेल्थ फाउंडेशन चोंढी-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने ताडवागळे येथे पंचक्रोशीतील गरजू बांधवांसाठी मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद शाळा, ताडवागळे येथे गुरुवार, 23 डिसेंबर रोजी हे नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 55 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यापैकी 12 जणांंच्या डोळ्यात मोतीबिंदू आढळून आले. त्यांच्यावर चोंढी येथील लायन्स हेल्थ फाऊंडेशनच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिराकरीता जीएमपी नोडल अधिकारी प्रदीप सिनकर, मनीष अग्रवाल, अरविंद अग्रवाल, प्रियांका पाटील, अरविंद अग्रवाल, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष प्रमोद पाटील, विनोद पाटील, प्रगती सिनकर,विकास पाटील,महेंद्र पाटील, प्रियांका पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version