नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
फेसबुक कंपनीने आपले नाव बदलून मेटा (Meta) झाल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ही घोषणा करण्यात आली. या नवीन नावामुळे कंपनी ज्या सेवा पुरवत आहे आणि ज्या क्षेत्रात कायम करत आहेत, त्याबद्दलची कल्पना अधिक स्पष्ट होईर्लें असा विचार यावेळी मांडण्यात आला.
फेसबुकने आपल्या कंपनीचं नाव बदलणार असल्याची घोषणा केली आहे, पण त्याचवेळी हेदेखील स्पष्ट केलं आर्हेें की फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहतील. म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ही नावं कायम राहतील. हे प्लॅटफॉर्म ज्या एका छत्राखाली येतील त्या कंपनीचं नाव मेटा असेल असं फेसबुकने स्पष्ट केलं आहे.
फेसबुकने नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे सध्या फेसबुकची ओळख एक सोशल मीडिया कंपनी अशी आहे. पण त्याच वेळी आम्ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक वापरले गेलेलं तंत्रज्ञान आणि उत्पादन विकसित केलं आहे, असं झकरबर्ग म्हणाले.