स्थानिकांसाठी तीन ई रिक्षांची सुविधा

सुरेखा भणगे यांची सकारत्मक भूमिका
| माथेरान । वार्ताहर ।
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार माथेरानमध्ये तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा सुरू झाल्यामुळे पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. परंतु या महत्वपूर्ण सेवेचा लाभ स्थानिकांना सुध्दा मिळावा यासाठी माजी नगरसेवक शिवाजी शिंदेंनी प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना लेखी निवेदन दिले होते. त्यावर चर्चा करून भणगे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन दि.(5) ही सेवा स्थानिकांना उपलब्ध केली जाईल त्याचप्रमाणे सकाळी लवकर कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांना रोज दहा रुपयांत येऊन जाऊन ही सुविधा दिली जाईल अशी ग्वाही भणगे यांनी दिल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तीन महिन्यांच्या या पायलट प्रोजेक्टमध्ये स्थानिकांना या ई रिक्षाचा किती लाभ होत आहे हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनाही त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी दि.5 पासून तीन रिक्षा स्थानिकांच्या सेवेत रुजू होतील ज्यावेळी स्थानिकांची संख्या कमी असेल त्यावेळी त्या रिक्षा पर्यटकांसाठी वापरण्यात येतील. – सुरेखा भणगे (शिंदे), प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद

Exit mobile version