तेव्हा फडणवीसांचा जन्मही झाला नव्हता – भुजबळ

| मुंबई | प्रतिनिधी |

सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्‍वभूमीवर नेत्यांची विधानं चर्चेत आहे. जेव्हा मी महापौर, आमदार झालो होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्मही झाला नव्हता, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.

मराठा आरक्षणावर बोलताना भुजबळ म्हणाले की, आमची कुठलीही वेगळी मागणी नाही. फक्त आमच्या ताटातले काही देऊ नका, त्यांना वेगळं आरक्षण द्या, असे भुजबळ म्हणाले. तसेच भुजबळ हे फडवीसांच्या म्हणण्यानुसार बोलत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यावर भुजबळ म्हणाले की, मी जेव्हा आमदार, महापौर झालो, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्मही झाला नव्हता. अशी परिस्थिती अजूनतरी आलेली नाही. तसेच देशात लोकशाही आहे, जरांगे पाटलांनी 288 जागांवर उमेदवार उभे केले पाहिजे. फक्त जिथे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी जागा राखीव आहेत, तिथे उमेदवार देऊ नका, असेही भुजबळ म्हणाले.

Exit mobile version