। मुंबई । वृत्तसंस्था ।
भाजपने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेच्या 16 मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. फडणवीस म्हणाले गेल्या दोन निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघात आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ 16 मतदारसंघात आहेत. या मतदारसंघासाठी काही केंद्रीय नेते प्रभारी म्हणून देण्यात आले आहेत. बारामती मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिली आहे.
विशेष लक्ष असलेल्या 16 मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांचा देखील मतदारसंघ होता. पण जे लोक आता युतीत भाजपसोबत आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार . पुढची लोकसभेची निवडणूक ही आम्ही शिवसेना आणि भाजप अशा युतीत लढणार आहोत. त्यामुळं जे भाजपसोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. आमची शक्ती त्यांना निवडून आणण्यासाठी खर्ची घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.