। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार फहीम खान याला गणेशपेठ पोलिसांनी अटक करीत दोन गुन्हे दाखल केले. त्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय त्याच्यावर सायबर पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. गणेशपेठ पोलिसांनी त्याला पहिल्या गुन्ह्यात अटक केल्यावर त्याने मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. याशिवाय त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते.
दरम्यान फहीमच्या कोठडीची तारीख शुक्रवारी संपली असता त्याला दुसऱ्या गुन्ह्यात गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक करीत, त्याला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले. त्याला ३१ मार्चपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे फहीमच्या नियमित जामिनावर मंगळवार, १ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.