महाड पोलादपुरमध्ये महावितरणची 5 कोटींची थकबाकी
। महाड । प्रतिनिधी ।
राज्य शासनाच्या वीज वितरण कंपनी अंतर्गत येणार्या महाड आणि पोलादपुर तालुक्यांतील वीज ग्राहकांकडे 17 सप्टेंबर पर्यंत पाच कोटी सत्तर लाख रुपयांची थकबाकी असुन वीज ग्राहकांनी त्वरीत थकबाकीची रक्कम जमा करावी अन्यथा वीज पुरवठा खंडीत करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना महाड, पोलादपुर, माणगाव, गोरेगाव येथील वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सभेमध्ये दिल्या.
महाड येथील कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेला प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना गणेशन म्हणाले, महाड, माणगाव, पोलादपुर, गोरेगाव येथील वीज ग्राहकांच्या थकबाकीमध्ये वाढ होत असल्याचे आढळून आल्याने अधिकार्यांनी याची दखल घेणे आवश्यक आहे. तसेच वीज बीलाची वसुल न झाल्यास वितरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या कारवाई करण्यात येईल असे सुतोवाच त्यांनी सभेमध्ये केले. महाड आणि पोलादपुर तालुक्यातील वीज ग्राहकांनी तातडीने आपली थकबाकी जमा करावी असे आवाहन देखिल त्यांनी केले.
वीज वितरण कंपनीच्या महाड उप विभागाअंतर्गत येणार्या महाड आणि पोलादपुर तालुक्यातील थकीत असलेल्या चाळीस हजार ग्राहकांचे पाच कोटी सत्तर हजार थकबाकी आहे. वारंवार सुचना करुन त्याच बरोबर ग्राहकांना थकबाकी जमा करण्याची विनंती करुनही रक्कम जमा होत नाही, याबाबत श्री गणेशन यांनी योग्य त्या सुचना येथील अधिकार्यांना दिल्या. या प्रसंगी अधिक्षक अभियंता पेणचें मुल्लाणी, महाड येथील उप कार्यकारी अभियंता सी.एस.कैंद्र, पोलादपुर येथील उप कार्यकारी अभियंता सुद यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.