| पनवेल | वार्ताहर |
खारघरवासियांनी सेंट्रल पार्क लगतच्या मैदानावर चिमुकल्यांसह तरुणांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, नववर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीनिमित्त शहरातील तरुण-तरुणींसह चिमुकले पतंग उडवण्याचा आनंद लुटताना दिसून आले. त्यामुळे शहरातील मैदानांना जत्रेचे स्वरूप आले होते.
शहरातील सेंट्रल पार्कलगत सिडकोच्या खारघर कार्पोरेट पार्कच्या मोकळ्या मैदानात लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक नागरिक पतंग उडवताना दिसले. काहीजण एकमेकांच्या पतंगाचा दोरा कापताना दिसले. तर कापलेले पतंग पकडण्यासाठीची स्पर्धा सुरु होती. सायंकाळी तीन ते सहा यावेळेत मैदानांना जत्रेचे स्वरूप आले होते. निरभ्र आकाशात हवेची हलकीशी झुळूक, हवेत पतंग उडवण्यासाठीची लगबग पाहण्यासारखी होती. अनेक पालक मुलांना पतंग उडवण्याबाबत माहिती देताना दिसून आले. विशेष म्हणजे, नायलॉन माज्यांचा वापर टाळला असल्याने मकर संक्रातीनिमित्त होणार्या पतंगोत्सवाचा मनमुराद आनंद घेताना दिसून आले.