। पनवेल । वार्ताहर ।
पोलीस अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र बाळगणार्या व आपल्या कारवर दुसर्या वाहनाची नंबर प्लेेट लावून वावरणार्या एका वकिलाला सीबीडी वाहतुक पोलिसांनी सीबीडी सेक्टर-15 भागात पकडले. दिपक वसंत चुरी असे या वकिलाचे नाव असून सीबीडी पोलिसांनी त्याला बनावटगीरी व फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. अधिक चौकशीत त्याने टोल चुकविण्यासाठी व कारवर बँकेकडून जफ्तीची कारवाई होऊ नये यासाठी त्याच्यावर दुसर्या कारचा नंबर फ्लेट लावल्याचे उघडकीस आले आहे.