| पनवेल | वार्ताहर |
पोलीस अधिकार्याचा गणवेश परिधानकरुन हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणार्या तोतया इसमास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरोपी नामे सलमान तजमुददीन मुलाणी, (वय 31), धंदा चिकन शॉप याने पोलीस उपनिरीक्षकचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे, असे भासवून सिताज हॉटेल कोळखे, पनवेल येथे गेला. हॉटेल मॅनेजरला माझ्या मैत्रीणीला शिवीगाळ करुन तिला कामावरुन का काढून टाकले, चल आत्ताचे आत्ता तिचा हिशोब कर, तिला लगेच कामावर घे नाहीतर तुझे हॉटेल बंद करुन टाकीन अशी धमकी देऊन त्यास मारहाण केली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल सिताज येथे जावून स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणुन सांगणारे सलमान तजमुददीन मुलाणी याचेकडे कौशल्यपुर्वक सखोल विचारपूस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या विरुध्द पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई मिलिंद भारंबे, संजय येनपुरे, विवेक पानसरे, अशोक राजपूत, नितीन ठाकरे, अभयसिंह शिंदे, यांनी केली आहे.
पनवेलमध्ये तोतया पोलिसास अटक
