दिवाळीच्या शुभमुहूर्तावार इंधन दरात घट

। मुंबई । वार्ताहर ।
इंधनदरात घट झाल्यावर दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशीचा नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने बुधवारी रात्री उशीरा पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला.
केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली आहे. केंद्राचा निर्णय आल्यानंतर देशातील काही राज्यांनी राज्य सरकारकडून इंधनावर आकारला जाणार व्हॅट ( मूल्यवर्धित कर ) कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे एकंदरीतच देशातील पेट्रोल, डिझेलचे दर हे कमी झाले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर हा 5 रुपये 87 पैशांनी कमी झाल्याने आता पेट्रोल 109.98 रुपयांना उपलब्ध आहे तर डिझेल हे 94.14 रुपयांना मिळत आहे.

Exit mobile version