सोन्या-चांदीच्या दरात घसरण

जाणून घ्या आजचा भावा
। मुंबई । वृत्तसंस्था ।

दिवाळी सणानंतर सोन्या-चांदिच्या दरात घसरण झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 46,220 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 46,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 64,400 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जाणुन घ्या आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,220 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,220 प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,920 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 49,160 रुपये आहे. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 46,220 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,220 रुपये इतका आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 625 रुपये आहे.

Exit mobile version