| पनवेल | वार्ताहर |
प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीनाथ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी (दि.21) रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यती साठी प्रसिद्ध होते. वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडी शर्यतची आवड निर्माण झाली होती. 1986 पासून त्यांची नाळ या क्षेत्राशी जोडली गेली. शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैलं त्यांनी राखून ठेवली आहेत.