एमपीएल तर्फे फॅन-पार्कचे आयोजन

। मुंबई । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा सध्या पुणे येथील गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर दिमाखदार पणे सुरू आहेत. आयपीएल नंतर लगेचच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने गतवर्षी पासून महाराष्ट्र प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जात आहे. स्पर्धेत 6 संघ सहभागी झाले असून 2 जून पासून स्पर्धेला सुरवात झाली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 22 जून रोजी होणार आहे.

गेली दोन वर्षे महाराष्ट्र प्रिमियर लिग हि स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. ठिकठिकाणी स्पर्धेची जाहिरात मोठे बॅनर लावून केली जात असे. यावर्षी पासून राज्यात विविध ठिकाणच्या मैदानावर फॅन-पार्क इव्हेंट आयोजित करून स्पर्धेची जाहिरात संपूर्ण महाराष्टातील कानाकोपर्‍यात पोचवली जात आहे. फॅन-पार्क इव्हेंटमध्ये मोठ्या डिजिटल पडद्यावर लाईव्ह मॅचचे प्रेक्षपण केले जाते. चितळे एक्सप्रेस पुरस्कृत असलेल्या फॅन-पार्कला प्रेक्षक मोठी गर्दी करून सामन्याचा आनंद घेत आहेत. शनिवारी अश्यायाच फॅनपार्कचे आयोजन खारघर येथील गोखले हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते.

स्काय स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक विनय पाटील यांनी पुढाकार घेऊन फॅनपार्कचे आयोजन केले होते. रायगड रॉयल्स विरुद्ध पुणेरी बाप्पा या संघाचा सामना मोठ्या डिजिटल पाड्यावर लाईव्ह दाखवण्यात आला. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सदस्य राजेश पाटील, अ‍ॅड.पंकज पंडित, खरघरचा राजा गणेश मंदिर संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील, खारघर येथील युवा खेळाडूंन सह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Exit mobile version