दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा एकत्रित निरोप समारंभ स्व. नामदेवशेठ खैरे सभागृहात 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सिद्धी शिंदे या दहावीच्या विद्यार्थिनीने केली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयातील गुरुजनांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमादरम्यान दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयास आपली आठवण म्हणून क्लास रूम डिजिटल साऊंड सिस्टीम शाळेला भेट देण्यात आली.

या निरोप समारंभ कार्यक्रम अध्यक्ष प्रा. संभाजी ढोपे, शिक्षक बबन पालवे, अशोक शिंदे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कादंबरी ठकोरे, सिद्धी शिंदे, रिया भोईर या विद्यार्थिनींनी केले.

Exit mobile version