| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |
श्री छत्रपती शिवाजी नूतन विदयालय यशवंतनगर नांदगाव हायस्कूलमधील इयत्ता दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. सदरील निरोप समारंभासाठी या शाळेचे अध्यक्ष फैरोज घलटे, संचालक कृष्णा अंबाजी, संचालक अरविंद भंडारी, मुख्याध्यापक श्रीधर ओव्हाळ, पर्यवेक्षिका अर्चना खोत, संचालक मुश्ताक झोबडकर, शिक्षक प्रतिनिधी महेश वाडकर, शिक्षकेत्तर प्रतिनिधी संतोष बुल्लू, प्रतीक पेडणेकर, सागर राऊत, योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शाळेच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला शिकवले. त्यांची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही. शाळेचा निकाल शंभर टक्के लागण्यासाठी सर्व विद्यार्थी निश्चित मेहनत घेतील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. शिक्षक प्रतिनिधी महेश वाडकर, पर्यवेक्षिका अर्चना खोत, सागर राऊत, प्रतीक पेडणेकर, राहील घलटे, मुख्याध्यापक श्रीधर ओव्हाळ यांचीसुद्धा मार्गदर्शन पर भाषणे झाली. सर्वानी अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करा, न घाबरता पेपर लिहा, आत्मविश्वास ठेवा, आपणास निश्चित यश मिळेल अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेस साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली.
फैरोज घलटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले कि, चांगला निकाल लावून शाळेचे नाव उजव्व्ल करा, परीक्षेला वेळेत जा, उत्कृष्ठ पेपर लिहून चांगले गुण मिळवा, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी घलटे यांनी लवकरच नांदगाव हायस्कूल येथे पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करणार आहोत. यासाठी स्थानिक जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन योगेश पाटील यांनी केले, तर आभार अर्चना खोत यांनी मानले. सदरील कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी उपस्थित होते.