| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील रा.जी.प. शाळा भाकरवड येथील मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील यांचां निरोप समारंभ शनिवारी (दि.24) मराठी शाळा भाकरवड येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती यांनी केले होते. यावेळी अरुण राऊत, धीरज पाटील, साधना पाटील, वैशाली पाटील, सामिता पाटील, पालक वर्ग , विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका प्रतीभा पाटील यांची शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भेट वस्तू, साडी, श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.