| पेण | प्रतिनिधी |
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या सार्वजनिक विद्यामंदिर रावे येथे 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अर्थातच आशीर्वाद प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने व संतोष पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे ग्राम प्रसारक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बी.आर. पाटील, अरुण पाटील, एस. आर. शेंडगे आदी उपस्थित होते. यावेळी प्रथम पाहुण्यांचे विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन यथोचित स्वागत केले. त्यानंतर विद्येची देवता माता सरस्वतीचे पुजन केले. त्याचप्रमाणे दिपप्रज्वलन केले. यावेळी 10 वीच्या विद्यार्थ्यांना एम. टी. पाटील, पाटील, मुख्याध्यापक शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे संतोष पाटील यांनी भुमिती या विषयाचे मार्गदर्शन केले. तर मुख्य अतिथी ॲड. मंगेश नेने यांनी भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कशी तयारी करायची याविषयी मार्गदर्शन केले. सेवा निवृत्त पोलीस अधिकारी बी.आर.पाटील यांनी जिवनामध्ये शिस्त किती महत्वाची आहे याविषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







