| पेण | प्रतिनिधी |
बोर्वे शाळेतून बदली झालेले मुख्याध्यापक अजित कोठेकर आणि उपशिक्षक विनोद म्हात्रे यांना नुकताच निरोप देण्यात आला. 2019 मध्ये जेव्हा या शिक्षकांनी शाळेत प्रवेश केला तेव्हा विद्यार्थ्यांची संख्या फक्त नऊ होती. मात्र, त्यांच्या आथक प्रयत्नांनी, प्रेमळ वागणुकीने आणि काटेकोर शिस्तीने शाळेचं रुपच पालटले आणि आज शाळेचा पट 53 वर पोहोचला आहे. मुख्याध्यापक कोठेकर यांनी पद सांभाळल्यानंतर गावातील लोकांना एकवटले आणि शाळेचा विकास केला. त्यांनी डिजिटल क्लासरुम, संगणक कक्ष, प्रत्येक वर्गात एल.ई.डी. टीव्ही, प्रोजेक्टर स्पीकर इत्यादी व्यवस्था करून शाळेला एक नवं आणि आधुनिक रुप दिले. या प्रवासात विनोद म्हात्रे यांनी त्यांच्या खाद्यांला खांदा लावून सुंदर सहकार्य केले. या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन बोर्वे गाव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक यांनी मिळून केले.






