नागांव-बागमळा येथे प्रात्यक्षिकासह शेतीशाळा संपन्न

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता चाचणी मोहिमेअंतर्गत नागांव-बागमळा येथे प्रात्यक्षिकासह शेतीशाळा संपन्न झाली. या शेतीशाळेत २५ शेतकरी महिलांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. या शेतीशाळेत भातशेती बियाणेची गुणवत्ता तपासणी प्रात्यक्षिक, भातशेतीस नुकसान करणारे किड व प्रतिबंधक उपाययोजना आदी विषयांवर नागांव कृषि सहाय्यक शितल साबळे यांनी माहिती दिली व उपस्थित महिला शेतकरी भगिनींकडून प्रात्यक्षिके करून घेतली. कार्यशाळेस ग्रामपंचायत सदस्या मिना म्हात्रे, हर्षदा मयेकर, बागमळा मराठी शाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
अशा कार्यशाळांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाची माहीती शेतकरीबांधवांपर्यत पोहोचविणे सोपे होउन भातशेतीउत्पादनात वाढ होउ शकेल असा विश्वास नागांव सरपंच निखिल मयेकर यांनी व्यक्त केला.

Exit mobile version