कोकणात 29 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड
| रत्नागिरी | वार्ताहर |
कोकणात सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून खरीप पेरण्या अंतिम टप्प्यावर आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 28 हजार 863.95 हेक्टर क्षेत्रावर भात पुनर्रलागवड करण्यात आले आहे. उर्वरित भात लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून मोठी लगबग सुरू आहे.
कोकणात यंदा मान्सून पूर्व पाऊस आठ दिवस आधीच आला मात्र धो-धो पाऊस झाला. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी मान्सूनला सुरूवात झाली. या अपेक्षेने खरीपपूर्व कामे मे मध्ये केली. शेतमळ्यांची साफसफाई करणे, पुनर्रलागवड करणाऱ्या जागांची सफाई, शेतात नांगरणी करून घेतली. मान्सूचा पाऊस दमदार झाल्यानंतर खरीप पेरण्यास सुरुवात झाली. दरम्यान, यंदा जिल्ह्यातील भात व नाचणी पिकाचे 52 हजार 522 हेक्टर क्षेत्रावर असून, आतापर्यंत 28 हजार 863.95 हेक्टर क्षेत्रावर पुनर्रलागवड झाली आहे. दरम्यान, जुलै महिन्यात 50 टक्के लागवड होण्याचे अपेक्षित होते. मात्र, अनियमित पावसामुळे भात पुनर्रलागवड कमी झाल्याचे सांगण्यात आले. यावर्षी भात लावण्यांची कामे पूर्ण होण्यास दहा दिवसांचा विलंब होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत 28 हजार हेक्टरवर खरीप हंगाम पुनर्रलागवड झेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यासाठी शेतकऱ्यांकडून लगबग सुरू आहे. या महिन्यात पेरण्या पूर्ण होतील.
शिवकुमार सदाफूले,
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी.







