| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शंभू सीमेवर शनिवारी (दि.14) पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. कारण, शेतकरी शंभू सीमेवरून दिल्लीला जाण्यासाठी ठाम आहेत. 101 शेतकर्यांचा एक गट दिल्लीकडे कूच करणार आहे. दरम्यान, हरियाणा सरकारने अंबालामधील काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारपासून 17 डिसेंबर (मध्यरात्री 12) पर्यंत इंटरनेट बंद राहणार आहे. शंभू सीमेवरून दिल्लीकडे शेतकर्यांचा निषेध मोर्चा पुन्हा सुरू होण्याच्या काही तास आधी, हरियाणा सरकारने शनिवारी ‘सार्वजनिक शांतता’ राखण्यासाठी अंबाला जिल्ह्यातील 12 गावांमध्ये मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा बंद केली. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुमिता मिश्रा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार हे निलंबन 17 डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे.