| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी 25 मे मध्ये रोहिणी नक्षत्र निघाल्यानंतर धूळ वाफेवर विविध जातीच्या भात बियाण्याची पेरणी केली होती. दरवर्षी साधारण 7 जूनला पाऊल येणार या आशेने तो होता. मात्र मृग नक्षत्रही संपल्यामूळे तरवा पावसाअभावी करपू लागला होता. गेल्या 15 दिवसापासून पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे भाताची रोपे चांगलीच वाढली असून येत्या दोन दिवसात शेतकरी भात लागवडीच्या कामाला लागणार आहे. भाताच्या लागवडीला पोषक पाऊस पडल्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. यंदाचे वर्षी तालुक्यात 12500 हेक्टर वर भात लागवड होणार असून शेतकऱ्यांना भात लागवडीचे वेध लागले आहे.
तालुक्यातील पारंपारिक भात शेतीसह लाल व काळ्या भाताच्या पिकाच्या वाणाची पेरणी व लागवड शेतकऱ्यांनी केल्यास आधुनिकीकरणाच्या भात पिकातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळेल. यासाठी विविध संस्था शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्यामुळे माणगावचा शाश्वत भात पिक उत्पादनाचा पॅटर्न जिल्ह्यासाठी कसा प्रभावी व उपयुक्त ठरणार आहे. याबाबत नव नवीन तंत्रज्ञान पुढे येत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो.







