बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपरद्वारे गरीब शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न
जेएनपीटी | वार्ताहर |
वाढत्या औद्योगिकरणामुळे आज उरण तालुक्यात जमिनीच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी – मोलाने विकायला घाट एजंट मार्फत होत आहे. उरणच्या माजी तहसीलदार मॅडमने बनावट सात बारा बनवून एका विकासकाला सुमारे दोन कोटींना चुना लावल्याचा प्रकार नुकताच झाला असताना काही जमीन एजंट बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपर द्वारे चक्क गरीब शेतकऱ्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रकार उघड होत आहेत.
उरण तालुक्यातील मौजे विंधणे येथील शेतकरी कृष्णाबाई बाळ्या ( ऊर्फ बाबू ) नवाळी यांनी सर्व्हे नंबर २३/६२१,२२,२९/१ आणि२६/६ ही मिळकत लल्लूभाई अभयचंद गुजर यांच्याकडून खरेदी खताने विकत घेतलेली जमीन आहे. त्याच जमिनीलगत मोहसीन मं याकूब खोत यांची सर्वे नंबर २३/८ व २०/० या मिळकती होत्या. त्या बाबू ( उर्फ बाळ्या ) जानू नवाळी यांनी रोख रक्कम देऊन खरेदी केल्या. आजपर्यंत ती जमीन गेली ६० वर्षे कृष्णाबाई बाळ्या ( उर्फ बाबू ) नवाळी. यांच्या ताब्यातच आहे. त्या जमिनीचा ती शेतसारा ( शेतावरील कर ) भरत आहेत.
परंतु मध्येच जांभुळपाडा येथिल सावित्रीबाई शंकर घरत हिने खरेदी खत केलेल्या मिळकतीवर दावा केला ; सदर कृष्णाबाईने उरण सिव्हिल कोर्टात केस हरल्यानंतर ; तिने अलिबाग कोर्टात अपील नंबर५०/२००६ मध्ये केला. कृष्णाबाई यांच्याकडे भक्कम पुरावे असून सुद्धा येथेही त्या केस हरल्या गेल्या. या पुढे कृष्णाबाईने हिम्मत न सोडता, त्यांनी मुंबई हायकोर्टात अपील ननंबर ३९४/२०१७ ला केस दाखल केली.
जेव्हा कृष्णाबाई यांचे हायकोर्टचे वकील भरत जोशी यांनी अलिबाग कोर्टाकडून सर्व दस्तऐवाज मागितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि, अलिबाग कोर्टात कृष्णाबाई बाळ्या (उर्फ बाबू ) नवाळी. ह्यांच्या नावे कोणी गणेश कोळश्या पाटील. ( मु. विंधणे खालचापाडा ) या इसमाने बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपर बनवून , बनावट कागद पत्रे घुसवून या बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपरवर तिच्या पतीची खोटी स्वाक्षरी करून साक्षीदार म्हणून दाखवले यावरून त्याने न्यायालयाची व शासनाची दिशाभूल करत आहे हे सिद्ध होते.
सादर बाबत हायकोर्टात केस दाखल असून सुद्धा या मिळकती जमिनी मिळवण्यासाठी तो गणेश कोळश्या पाटील व अविनाश रामकृष्ण पाटील व त्याचा भाऊ प्रशांत या गावगुंड एजंट कडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा अवलंब करून कृष्णाबाई यांच्या परिवाराला वारंवार शिवीगाळी, धमकावणे, दमदाटी करून या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत या गावागुंड एजंट विरुद्ध तक्रार चिरनेर पोलीस स्टेशन व उरण पोलीस स्टेशनमध्ये रीतसर नोंद केली आहे. शेवटी, कृष्णाबाईंना न्याय मिळावा म्हणून उरण सिव्हिल कोर्टात त्यांनी अपील नंबर ४८/२०२१ मध्ये दाखल केली असून ते आता न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
गरीब शेतकऱ्याच्या जमिनी बनावट कागदपत्रे बनवून परस्पर विकल्या जात असतील तर हा प्रकार अत्यंत घातक आहे.या बाबत शासनाने सविस्तर माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या व बनावट कागदपत्रे दाखल करणाऱ्या समाजविघातक एजंट इसमान विरुद्ध कडक कारवाई करून गरीब शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा. भरत जोशी , जेष्ठ वकील,हायकोर्ट
उरण तालुक्यात असे प्रकार होत असतील तर ते नक्कीच गंभीर आहे.शेतकऱ्यांनी तक्रार केली तर त्याची शहानिशा करून संबंधित एजंट लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.तत्पूर्वी शेतकऱ्यांनीही बोगस एजंट्स च्या भूलथापांना बळी पडू नये.
भाऊसाहेब अंधारे , तहसीलदार, उरण