| नेरळ | प्रतिनिधी |
आपल्या देशात 23 डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्जत तालुका किसान क्रांती संघटनेचे वतीने शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
शेतकरी आपल्या शेतामध्ये अन्नधान्य भाजीपाला पिकवून जनतेची मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा यापैकी अन्न ही मूलभूत गरज बळीराजा पूर्ण करत असतो. शेतामध्ये काम करणारे शेतकरी यांचा सन्मान व्हावा यासाठी 23 डिसेंबर शेतकरी दिनाचे निमित्त शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य किसान क्रांती संघटना कर्जत तालुका कमिटी यांनी शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करण्यासाठी त्या नियोजनाची सभा घेण्यात आली. 23 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांचा सन्मान केला जाणार त्याची पूर्वतयारी सभेत कर्जत तालुका अध्यक्ष भरत राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती. किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य कर्जत तालुका महिला कमिटीच्या अध्यक्षपदी शिल्पा शिवाजी लोभी, उपाध्यक्ष आशा सुदाम कोळंबे, सचिव गायत्री गणेश ऐनकर, यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली असून, मधुरा सुनील शेळके, सहसचिव सुमन भोईर, सल्लागार अश्विनी भवारे, स्मिता तुपे, दीपा रुठे, या महिला कमिटीची नव्याने नियुक्ती करण्यात आली.
या सभेसाठी महाराष्ट्र राज्य किसान क्रांती संघटनेचे संघटक विनायक देशमुख, रायगड जिल्हा अध्यक्ष उत्तम शेळके, कर्जत तालुका अध्यक्ष भरत राणे, उपाध्यक्ष शरद तवले, प्रवक्ते सुरेश खानविलकर, सल्लागार पंढरीनाथ दाभाडे, काशिनाथ धुले, साधू राम पाटील, जगन्नाथ पाटील, सचिव एकनाथ शेळके, कार्याध्यक्ष अनिल गवले, संपर्कप्रमुख सुरेश राणे, रमेश शेळके सुरेश जाधव, जिल्हा संघटक एकनाथ कांबेरे, रमाकांत जाधव, दीपक देशमुख राजेश भोईर असे अनेक किसान क्रांती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कर्जतमध्ये शेतकरी दिनाचे आयोजन
