शेतकर्‍यांचा शेताच्या बांधावर सन्मान

कर्जत प्रेस क्लबचा स्तुत्य उपक्रम
नेरळ | वार्ताहर |
कर्जत प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 1 जुलै कृषी दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील दोन शेतकर्‍यांची निवड करून त्यांचा शेताच्या बांधवार जाऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर तसेच कर्जत प्रेस क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्हयातील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकर्यांचा सन्मान त्यांच्या शेताचा बांधावर जाऊन करण्यात येतो. जिल्ह्याचे प्रेस क्लबचे युनिट सन्मानासाठी निवडलेल्या शेतकर्‍यांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन करतात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी भालीवडी येथे कमी संख्येत हा कार्यक्रम घेण्यात आला. भालिवडी येथील विहान कृषी पर्यटन केंद्र येथे गुरुवार, दि. 1 जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्जत प्रेस क्लबच्या वतीने कर्जत तालुक्यातील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकर्यांचा सन्मान भालीवडी येथे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन करण्यात आला.

यावर्षी भालीवडी येथील प्रगत शेतकरी अशोक नारायण पाटील आणि पिंपलोळी येथील प्रगत शेतकरी काशिनाथ भाऊ काळण या दोन शेतकर्यांना कर्जत प्रेस क्लबच्या वतीने आदर्श आदर्श शेकतरी 2021 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी कृषीविद्यापीठ विस्तार शास्त्रज्ञ रवींद्र मर्दाने, मंडळ कृषी अधिकारी विजय वानखेडे, कृषी सहाय्यक कल्याणी कोरपड, भालीवडी ग्रामपंचायतीचे सरपंच, प्रभाकर गंगावणे, सुदाम भोईर, कर्जत प्रेस क्लबचे सल्लागार, विजय मांडे, रायगड प्रेस क्लबचे खजिनदार दर्वेश पालकर, कर्जत प्रेस क्लबचे उपाध्यक्ष विलास श्रीखंडे, कार्याध्यक्ष कांता हाबळे, सदस्य जयवंत हाबळे, भूषण प्रधान, गणेश पवार, गणेश मते, विकास मिरगणे आदी यावेळी उपस्थित होते. तर यावेळी कृषीविद्यापीठ विस्तार शास्त्रज्ञ रवींद्र मर्दाने, मंडळ कृषी अधिकारी विजय वानखेडे, कृषी सहाय्यक कल्याणी कोरपड यांनी शेतकर्‍यांना विविध योजनांची माहिती देत विशेष मार्गदर्शन केले.

Exit mobile version