डोलवी एमआयडीसी भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांचा विरोध

आक्रमक बळीराजाला मोजणी अधिकारी घाबरले
। गडब । वार्ताहर ।
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव, गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोळवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट, या गावातील जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला येथील शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला आहे. कोलवे या ठिकाणी शेतकर्‍यांनी गुरुवारी एकत्र जमून या मोजणीला विरोध केला. या वेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पेण पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, निलेश म्हात्रे, विजय पाटील, सुशील कोठेकर, राजू पाटील, महेश पाटील, महेंद्र कोठेकर, गजानन पेढवी, प्रविण म्हात्रे, प्रभाकर पाटील आदींसह शेतकरी, महिला, शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रकल्पातील खारजांभेळा, खारचिर्बी, खारढोंबी या गावातील जमिनी शासनाने भूसंपादनातून वगळण्याचा निर्णय घेतला असला तरी कोलवे, बेणेघाट, वावे,डोलवी, काराव, खारमांचेळा, खारकारावी या गावातील जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणार असल्याने या संदर्भात जमीन मोजणी नोटीस येथील शेतकर्‍यांना देण्यात आली. या नोटिसी शेतकर्‍यांनींनी स्वीकारल्या नाहीत. कोलवे येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी एकत्र जमून या मोजणीस विरोध केला. ज्या प्रमाणे तीन गावे वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याच प्रमाणे या प्रकल्पातील सर्व गावे भूसंपादनातुन वगळुन हा प्रकल्पच शासनाने रद्द करावा अशी मागणी शेतकर्‍यांंनी केली.

प्रकल्पामुळे उपजिविकेचे साधन नष्ट
या भूसंपादनामुळे शेतकर्‍यांंचे उपजिविकेचे साधन नष्ट होणार आहे.गावाचा विस्तार करण्यासाठी जागाच शिल्लक राहाणार नाही. तर अनेकांचे छोटे मोठे व्यवसाय या जागेत आसल्याने अनेकांचा रोजगार जाणार आहे त्यामुळे त्यामुळे या भूसंपादनाला शेतकर्‍यांचा विरोध आहे. हे भूसंपादन रद्द करावे अशा हरकती उपविभागिय अधिकारी कार्यालय पेण येथे शेतकर्‍यांनी नोदविल्या असताना आम्हाला विश्‍वासात न घेता हा प्रकल्प लादला असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

आम.जयंत पाटील यांचाही विरोध
तर आमदार जयंत पाटील यांनी देखील विधानपरिषदेत या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे व प्रकल्प रद्द करावा अशी मागणी शासनाकडे केली असल्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे शेतकर्‍यानी सांगितले. शेतकरी आक्रमक झाले असल्याने शेतक-यांचा तीव्र विरोध पाहता मोजणीचे अधिकारी कोलवे या ठिकाणी आलेच नाही

Exit mobile version