शेतकर्‍यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार

। मुंबई । प्रतिनिधी ।
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकर्‍यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागानं हा निर्णय जाहीर केला आहे.

जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत. बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारनं नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

जून आणि ऑक्टोबरमहिन्यात राज्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. यानंतर झालेल्या नुकसानीसाठी मदतीची मागणी केली जात होती. यानंतर शेतकर्‍यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानंतर पावसामुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 5 हजार 439 कोटींचा निधी तरतूद करण्यात आला आहे.

Exit mobile version