बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंताग्रस्त

। पाताळगंगा । वार्ताहर ।
वातावरण सातत्याने बदल घडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पहाटे धुके मोठ्या प्रमाणात पडत असले तरी सुद्धा सायंकाळी आकाशात ढग दाटून येत आहे. यामुळे हा पावसाळा म्हणावे की उन्हाळा म्हणावे का हिवाळा अशीच स्थिती बळीराजाची झाली आहे. भातशेती उत्तम बहरली असून काही ठिकाणी धरतीवर सोनेरी शाल परिधान केली असल्याचे जाणवू लागले आहे. मात्र सायंकाळी होताच बळीराजाच्या तोंडचे पाणी पळत आहे.

सायंकाळी आकाशात ढग निर्माण होऊन पाऊस पडत असल्यामुळे शेतात तयार झाले धान्य या पावसामुळे नुकसान होण्याच्या मार्गावर असताना शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असून लोंब्यातील दाणा अलग होत आहे. भात कापणी करण्यास अजून भात कापण्यास तयार झाली नसून परतीच्या पावसामुळे भात शेती पडत आहे. पाऊस पडला तर हाताला भाताचा दाणा मिळणार नाही. या विचारांतून बळीराजा मोठ्या संकटात सापटले आहे. पाऊस शांत झाला असता तर भातकापणीस प्रारंभ झाला असता, मात्र सायंकाळी येत असलेल्या पावसामुळे शेतकरी पुरता चिंताग्रस्त झाला आहे.

Exit mobile version