मयंकनची वेगवान गोलंदाजी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत 11 व्या सामन्यात लखनौच्या 21 वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादवने पंजाबचा कर्णधार शिखर धवनविरुद्ध ताशी 155.8 किमी वेगाने चेंडू फेकला. हा यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडूही ठरला. या सामन्यात त्याचा वेग हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. त्याने सातत्याने ताशी 140 ते 155 किमी वेगाने गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजांना भांडावून सोडले. विशेष म्हणजे याच सामन्यातून मयंकने आयपीएलमध्ये पदार्पणही केले, तसेच सामनावीर पुरस्कारही जिंकला.

Exit mobile version