जिल्हा रुग्णालयातील कारभाराविरोधात उपोषण

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रुग्णालयाची ढासळलेली इमारत, अस्वच्छता, कर्मचार्‍यांचा छळ, आर्थिक गैरव्यवहार अशा अनेक प्रश्‍नांबाबत गेली तीन वर्षापासून उपोषणकर्ते प्रल्हाद म्हात्रे, नितीन वाडेकर, रमेश देवरुखकर, अनिकेत वाडकर लढा देत आहेत. मात्र त्याबाबत कोणतीही सुधारणा करण्यात आल्या नाहीत. रुग्णालयातील या काराभाराविरोधात तिघांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

108 रुग्णवाहिकांबाबत जिल्हा नियामक समितीची बैठक दरमहा न चुकता आयोजित करावी. सर्वेश कोळगावकर आणि अनिकेत वाडकर या दोघांवर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वतंत्र चौकशी करावी. या संबंधित उपसंचालक कार्यालयास शिफारस करावी. मयत महिला रुग्ण आंग्रे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या यंत्रणेविरोधात चौकशी पुर्ण करून दोषींविरोधात गुन्हा दाखल कराव. बाह्य रुग्ण कक्ष, प्रयोगशाळा, अन्य विभागातील गैरसोयींवरील तक्रारींची प्रशासनाने दखल घ्यावी, अशा अनेक मागण्यांसाठी प्रल्हाद म्हात्रे, नितीन वाडेकर, रमेश देवरुखकर, अनिकेत वाडकर उपोषण सुरु केले. मात्र 108 रुग्ण वाहिकांच्या प्रश्‍नांबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सकारात्मक चर्चेत 17 मेपर्यंत जिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

Exit mobile version