विजेच्या लपंडावामुळे उपोषण; निसर्ग पर्यटन संस्था

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. माथेरानमध्ये पर्यटन हा एकमेव व्यवसाय असून त्यासाठी वीजही महत्वाची बाब आहे आणि माथेरानमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे महावितरणच्या कारभारविरोधात निसर्ग पर्यटन संस्था उपोषण करणार असल्याचे निवेदन निसर्ग पर्यटन संस्थेकडून महावितरणच्या उपअभियंत्यांना देण्यात आले आहे.

माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असुन येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. माथेरानला कुठल्याही प्रकारची शेती होत नसुन पर्यटन हिच माथेरानची शेती आहे. त्यामुळे येथील जीवनमान हे पर्यटनकांवर अवलंबुन आहे. असे असताना महावितरणच्या कारभारचा फटका येथील पर्यटन व्यवसायाला बसत आहे. शहरात दररोज अनेकवेळा विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर होत आहे. सध्या ऑनलाईनचे युग असुन येणारे पर्यटक हे शक्यतो ऑनलाईन पेमेंट करत आहेत. तसेच, एटीएमचा वापर देखील करत आहेत. येथील खंडित होणाऱ्या विद्युत प्रवाहाचा फटका पर्यटक व्यवसायाला बसत आहे.

तसेच, माथेरानमध्ये ई-रिक्षा चालु झाल्यामुळे खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे ई-रिक्षा चार्जिंग होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास विलंब होत आहे, त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. महावितरणने आपला गलथान कारभार न सुधारल्यास निवेदन दिल्यापासून वीस दिवसात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी महावितरणला दिला आहे.

Exit mobile version