| उरण | वार्ताहर |
राज्यस्तरीय महाआंदोलन समिती, महाराष्ट्र राज्य आदिवासी कोळी जमातींच्या अस्तित्वासाठी आणि संविधानिक हक्कांसाठी उपोषण मंगळवार, दिनांक 23 जानेवारीपासून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
विविध मागण्यांसाठी अध्यक्ष जगन्नाथ बाविस्कर, आयोजक, सखाराम बिन्हाडे आदींच्या उपस्थित उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाला जयवंत पोकले, जलदीप तांडेल, बळीराम नाखवा, मनोज कोळी, मीनाक्षी मिस्त्री, शिवदास मिस्त्री यांनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला. जोपर्यंत कोळी समाजाच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार कोळी बांधवांनी केला आहे.