लहानग्यांचे रोजे गोड

। म्हसळा/माणगाव । प्रतिनिधी ।

मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिन्याचे उपवास (रोजे) संपत असून 11 एप्रिल रोजी रमजान ईद (ईद-उल-फित्र) संपन्न होत आहे. मुस्लिम समाजातील शिकवणीनुसार आणि मुस्लिम धर्माच्या परंपरेप्रमाणे प्रत्येक मुलाने आणि मुलीने लहानपणीच संपूर्ण महिनाभर उपवास करायचे असतात.



यावेळी म्हसळा कुंभार आळीतील इब्राहिम नविद वस्ता (7), जुने माणगाव येथील बुशरा इम्रान धवलारकर (8), सॉलीहा आदिल गजगे (9), तळा मेठ मोहल्ला येथील जैद नसीर रहाटविलकर (9) व अब्दुलकरीम बरकतअली रहाटविलकर (9) यांनी अत्यंत कोवळ्या वयात पवित्र रमजानचे सर्व रोजे यशस्वीपणे पूर्ण केल्याने त्यांचे म्हसळा, माणगाव व तळा तालुक्यातून विशेष कौतुक व अभिनंदन होत आहे.

इस्लाम धर्मात ईमान, नमाज, रोजा, जकात, हज हि पाच मूलभूत तत्वे मानली जातात. त्यापैकी रमजान महिन्यातील रोजा हा एक आहे. इस्लामी शाबान महिन्यानंतर रमजान महिना सुरु होतो. यावर्षी 12 मार्चपासून रमजान रोजे सुरु झाले होते. हे रोजे अत्यंत कडक असतात. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात दरवर्षी हे रोजे महिनाभर धरीत असतात.

Exit mobile version