कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती
। वेनगाव । अनिल गवळे ।
महावितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात कर्जतमधील सर्वसामान्य नागरिक आक्रमक झाला आहेत. कर्जत तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावे तसेच अशा अनेक मागण्यासाठी महावितरणच्या विरोधात आज पासून कर्जत तालुका वीज ग्राहक समितीच्यावतीने साखळी उपोषण सुरू केले आहे.
उपोषणात सर्व सामान्य नागरिक महिला वर्ग, वृद्ध नागरिक यांनी मोठा सहभाग घेतला आहे, गेल्या काही महिन्यापासून कर्जत शहरात आणि ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे, बिल भरमसाठ येत आहेत, महावितरणकडे अनेक वेळा तक्रारी करून वीज वितरण अधिकार्यांबरोबर बैठका घेऊन सुद्धा समस्येचे निराकरण झाले नाही , त्यामुळे कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती आक्रमक होत साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे, हे उपोषण कर्जत शहरातील टिळक चौक कर्जत पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुन्या नगरपालिकेच्या शेजारी सकाळी दहा वाजता सुरू झाले आहे, या उपोषण ठिकाणी शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणात महिला आणि वृद्ध व्यक्तीचे मोठा सहभाग घेतला होता, उपोषण ठिकाणी उपोषणकर्ते कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समितीचे अॅड, कैलास मोरे , अॅड, संदीप घरत, राजेश मिरकुटे, अॅड चंद्रा चव्हाण, अस्मिता सावंत, हरीश सोनवले, मल्हारी माने, ऋषिकेश भगत, विशाल कोकरे, राकेश इंगळे, शिवाजी शिंदे, रवींद्र सिरसगर, मुकेश पाटील, हेमंत बेडेकर, कृष्णा पवार, दिलीप शिंदे, संतोष मुने, मनोज पाटील, तुषार वाडेकर, ऋषिकेश भगत, संतोष मुने, अजय ठमके आदि सह उपोषणकर्ते आज पहिल्या दिवसाच्या उपोषण आंदोलनास बसले आहेत.
उपोषणकर्त्यांनी दिलेल्या समस्यांच्या मागणीच्या निवेदणानुसार महावितरणकडून त्वरित वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच सांगितले की जर मागण्या पूर्ण झाले नाहीत, तर आंदोलन आणखी अधिक तीव्र केले जाईल, महावितरणला कित्येक वेळा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कोणतीही उपाययोजना करताना दिसून न आल्यामुळे, नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज असल्याने उपोषण आंदोलनाचे हत्यार हाती घेण्यात आले आहे, यावेळी उपोषण ठिकाणी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी आपले पत्र देऊन पाठिंबा दर्शवला आहे.