| नाशिक | वार्ताहर |
नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ब्रेक फेल झालेल्या कंटेनर गाडीने सहा ते सात वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. या अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून धडक दिल्यानंतर कंटेनर हा महामार्गालगत असलेल्या नाल्यात जाऊन पलटी झाला आहे. घटनास्थळावर महामार्ग पोलीस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका आणि जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका रवाना झाली आहे. तर आज विकेंड असल्यामुळे कसारा घाटामध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणत गर्दी झाली असून त्यातही हा अपघात झाल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अपघातस्थळी दाखल झाले. जखमींना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.