गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन म्हसळा मार्गावरील बोडणीची डाग या घाट रस्त्यावरील तीव्र वळणाच्या उतारावर सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकचा शुक्रवारी (दि. २३) दुपारी अपघात झाला. नवी मुंबई येथून श्रीवर्धनकडे गॅस सिलेंडर घेऊन येणाऱ्या ट्रकचे (एम एच ४६ बी बी ३०२७) ब्रेक निकामी झाल्याने अवघड वळणावर ट्रक पलटला. चालक व क्लीनर यांनी प्रसंगावधान दाखवून उडी मारल्याने दोघे बचावले. श्रीवर्धन ते म्हसळा रस्त्यावर अनेक ठिकाणी तीव्र उतार व वळणावर रस्ते असून या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत‌. धोकादायक वळणावर व रस्त्यावर स्टील बीम क्रॅश बॅरियर्स अथवा काॅक्रीट बॅरियर्स तसेच रंबल स्ट्रीप गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी आता वाहनचालकांनी केली आहे.

Exit mobile version