टँकर व डबल डेकर बसचा भीषण अपघात; 20 जाणांचा मृत्‍यु; 30 जण जखमी

| लखनऊ | वृत्तसंस्था |

उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी (दि.7) पहाटेच्या वेळी बसला भीषण अपघाता झाला. या अपघातात 18 जणांचा जागीच तर 2 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 30 जण गंभीर जखमी आहे त्यामुळे मृत्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भीषण अपघाताचे व्हिडीओ समोर आले आहेत.

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन डबल डेकर बस दिल्लीच्या दिशेने निघाली होती. जेव्हा बस उन्नाव जिल्ह्याच्या सीमाभागात पोहोचली तेव्हा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दूध टँकरला जाऊन धडकली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नावमधील अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातावर शोक व्यक्त केला. उन्नाव दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. उन्नावचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू केला आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरु आहे. दरम्यान मृतांमध्ये 14 पुरुष प्रवाशांसह दोन महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

Exit mobile version