| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग – पेण मार्गावरील आंबेघरजवळ दुचाकी व कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी चालक जखमी झाला असून त्याला वडखळ येथील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
ही घटना शनिवारी (दि.9) सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची प्राथमिक माहिती पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार यांनी दिली.